राहुल गांधी ‘वायनाड’ची जागा सोडणार, प्रियांका गांधी लढवणार ‘पोटनिवडणूक’; मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
Updated On:

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार असून ते रायबरेलीचे खासदार राहतील. तर प्रियांका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड अशा दोन ठिकाणांहून निवडणुक लढवली होती. दोन्ही ठिकाणी त्यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला. त्यानंतर त्यांना एक जागा सोडावी लागणार होती. त्याचा निर्णय आज झाला असून बैठकीनंतर पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहूल गांधी रायबरेलीचे खासदार राहतील तर वायनाडमधून प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.





