Rahul Gandhi : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भ्रष्टाचारात आपल्या कुटुंबाला गोवून एक मोठी चूक केली आहे. आता त्यांच्या कुटुंबावरही आरोप केले गेले आहेत. आता आसाम निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस (Rahul Gandhi) सत्तेवर आल्यास सरमा यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल. सरमा यांनी माफी मागितली तरी आम्ही त्यांना सोडणार नाही आणि जोपर्यंत त्यांना तुरुंगात पाठवले जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले आहे. rahul gandhi, आसाममधील बिस्वनाथ येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना, राहुल गांधी यांनी भाजपप्रणीत केंद्र सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री सरमा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला राहुल गांधी म्हणाले की, राज्याच्या राजकारणात बाह्य हस्तक्षेप होत आहे. आसाम सरकार प्रत्यक्षात दिल्लीच्या नियंत्रणाखाली आहे. डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदींना नियंत्रित करतात आणि नरेंद्र मोदी व अमित शाह आसामच्या मुख्यमंत्र्यांना नियंत्रित करत आहेत. आसामचे सरकार मुख्यमंत्री सरमा नव्हे, तर दिल्लीतून अमित शाह चालवत आहेत. वन स्टॉप सेंटर्स चर्चेत प्रचार सभांव्यतिरिक्त, राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केंद्र सरकारच्या वन स्टॉप सेंटर्सच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिलांना मदत करण्यासाठी स्थापन केलेली ही केंद्रे आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरली आहेत. मोदी सरकार या मुद्द्यावर कोणाचेही ऐकून घेण्यास तयार नाही. सुरक्षा ही सरकारची मूलभूत जबाबदारी आहे. पीडित महिला मदतीसाठी भटकत आहेत, परंतु सरकारने त्यांचे दरवाजे बंद केले आहेत.