Rahul Gandhi Vs Narendra Modi – लोकसभेतील राज्यघटनेवरील दोनदिवसीय चर्चेची शनिवारी सांगता झाली. त्या चर्चेवेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्या. दोन्ही बाजूंकडून परस्परांवर राज्यघटनेवरील हल्ल्यांवरून नेम धरण्यात आला.
तसेच, राज्यघटनेचे रक्षण आम्हीच करत असल्याचे ठसवण्याचा प्रयत्न झाला. चर्चेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह विरूद्ध कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी असे चित्र पहावयास मिळाले.
त्यानंतर चर्चेच्या अखेरच्या दिवशी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध विरोधी पक्षनेते राहुल गांधी असा मुकाबला रंगला. त्यामुळे राज्यघटनेवरील शाब्दिक युद्ध शिगेला पोहचले.
भाषणातील ठळक मुद्दे :
नरेंद्र मोदी :
– प्रत्येक मोठ्या योजनेच्या केंद्रस्थानी महिला
– देशाची एकता ही आमची प्राथमिकता
– धर्माच्या आधारे आरक्षण नाही
राहुल गांधी :
– संविधानापेक्षा मनुस्मृतीला वरचं स्थान
– तब्बल ७० वेळा पेपर फुटल्याच्या घटना
– अदाणी आणि अंबानींचा फायदा करण्याचं काम