जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा; म्हणाले “अजूनही पंतप्रधान उत्सवात मग्न”

Rahul Gandhi| जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील तीन दिवसात जम्मू-काश्मीरमध्ये तीन हल्ले झाले आहेत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधींनी ट्विटरवर लिहिले आहे की, “अभिनंदन संदेशांना उत्तर देण्यात व्यस्त असलेले नरेंद्र मोदी यांना जम्मू-काश्मीरमध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत. गेल्या 3 दिवसांत रियासी, कठुआ आणि डोडामध्ये 3 वेगळ्या दहशतवादी घटना घडल्या आहेत, पण पंतप्रधान अजूनही उत्सवात मग्न आहेत. देश उत्तर मागत आहे. भाजप सरकारमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणाऱ्यांना का पकडले जात नाही?’ असे राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हंटले आहे. दरम्यान, सातत्याने होणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील या हल्ल्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
बधाई संदेशों का जवाब देने में व्यस्त नरेंद्र मोदी को जम्मू-कश्मीर में निर्ममता से मौत के घाट उतार दिये गए श्रद्धालुओं के परिवारों की चीखें तक नहीं सुनाई दे रही हैं।
रियासी, कठुआ और डोडा में पिछले 3 दिनों में 3 अलग-अलग आतंकी घटनाएं हुई हैं लेकिन प्रधानमंत्री अब भी जश्न में मग्न…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 12, 2024
डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या टेम्पररी ऑपरेटिंग बेस (TOB) वर मंगळवारी हा हल्ला करण्यात आला आहे. यावेळी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात एक नागरिक जखमी झाला आहे. तर भारतीय लष्कराकडून एका दहशतवादाचा खात्मा करण्यात आला आहे.
जम्मूच्या डोडा जिल्ह्यातील छत्रकला भागात दुसरी चकमक सुरू आहे. छत्रकला भागात जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या तात्पुरत्या तळावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता रियासी आणि कठुआनंतर जम्मू भागात गेल्या तीन दिवसांत झालेला हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे. Rahul Gandhi|
दरम्यान, रविवारी दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला केला होता, त्यानंतर ही बस दरीत कोसळली. या दहशतवादी हल्ल्यात नऊ प्रवासी ठार झाले, तर 30 हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात आले.
हेही वाचा:





