राहुल गांधींचे लोकसभा सभापतींना पत्र ; सभागृहातील भाषणातील शब्द हटवल्याने संताप

Rahul Gandhi Speech । लोकसभेच्या कामकाजातून आपल्या भाषणातील काही भाग काढून टाकल्याने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहीत सभागृहाच्या नियमांची आठवण करून दिली. सभापतींना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी यांनी, “माझे मत कामकाजातून काढून टाकणे हे संसदीय लोकशाहीच्या आत्म्याविरुद्ध आहे. अशा परिस्थितीत माझ्या भाषणातील हटवलेले भाग पूर्ववत करावेत.” अशी मागणी देखील त्यांनी यातून केली आहे.
भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे भाषणही आरोपांनी भरलेले होते, मात्र त्यांच्या भाषणातून एकच शब्द काढण्यात आला, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. याबाबत केलेला भेदभाव समजण्यापलीकडचा आहे,” अशी खंत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.
पत्राद्वारे काय म्हणाले राहुल गांधी ? Rahul Gandhi Speech ।
राहुल गांधींनी पत्रात, “मी सभागृहात सत्य मांडले, संसदेत जनतेशी संबंधित प्रश्न मांडण्याचा अधिकार प्रत्येक खासदाराला आहे. हेच लक्षात घेऊन मी माझे भाषण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जगात सत्य पुसले जाऊ शकते, परंतु वास्तवात नाही,” असेही ते आज सकाळी म्हणाले. त्याचवेळी राहुल गांधींनी पत्र लिहिल्याचा बदला भाजपने घेतला आहे.

काय म्हणाले भाजप ? Rahul Gandhi Speech ।
केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर म्हणाले की, “राहुल गांधींच्या भाषणातील काही भाग काढून टाकण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना आहे. खरे तर, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान लोकसभेत दिलेल्या राहुल गांधींच्या भाषणातील काही भाग सोमवारी काढून टाकण्यात आले आहेत.
हेही वाचा
हिंदूंच्या वक्तव्यावर रामदास आठवले म्हणाले,’राहुल गांधी स्वतः दहशतवादी आहे…’





