Rahul Gandhi: राहुल गांधींचे मोदींना आव्हान! ‘हिम्मत असेल तर भारत-अमेरिका ट्रेड डील रद्द करून दाखवा’
Rahul Gandhi:

Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिले आहे. एका जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “सरकारमध्ये खरोखरच हिम्मत असेल तर भारत आणि अमेरिकेदरम्यान प्रस्तावित असलेला व्यापार करार रद्द करून दाखवा.” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाक्युद्ध तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
विदेशी दबावापुढे सरकार नमते — राहुल गांधी
केंद्र सरकारच्या ‘मजबूत’ प्रतिमेवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, “सरकार नेहमी सार्वभौमत्व आणि देशहिताच्या मोठ्या गप्पा मारते, मात्र प्रत्यक्षात विदेशी दबावापुढे नमते.” त्यांनी असाही आरोप केला की असे आंतरराष्ट्रीय करार केवळ मोजक्या मोठ्या उद्योग समूहांच्या फायद्याचे असतात, तर सामान्य नागरिक, शेतकरी आणि छोटे व्यापारी यांना त्याचा फटका बसतो. किसान महाचौपालमध्येही त्यांनी मोदींवर ‘कॉम्प्रोमाइज्ड पंतप्रधान’ असा हल्लाबोल केला.
मोदी जी, खुली चुनौती है – India-US Trade deal रद्द कर के दिखाइए।
अमेरिकी सुप्रीम कोर्ट ने ट्रम्प के टैरिफ़ रद्द कर दिए, दुनिया भर के देशों ने अपने समझौते renegotiate कर दिए – आप क्यों खामोश हैं?
सारा देश जानता है आप ये नहीं कर सकते – क्योंकि आप अमेरिकी Grip में Choke कर पूरा… pic.twitter.com/DWODIeF9z7
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 24, 2026
एपस्टाईन फाइल्सवरूनही केंद्रावर निशाणा –
राहुल गांधी यांनी एपस्टाईन फाइल्सच्या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सोशल मीडियावर त्यांनी लिहिले की, या फाइल्समध्ये पंतप्रधान, त्यांचे मंत्री आणि त्यांचे मित्र यांची नावे येणे लाजिरवाणे आहे. त्याचबरोबर अमेरिकेत अदानी यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्याचा उल्लेख करत ते म्हणाले की, १४ महिन्यांत या प्रकरणात कोणतीही कारवाई न होणे हे देशाच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
मोदी जी, आप शर्म की बात करते हो? शर्म की बात मैं आपको बताता हूं।
Epstein files में आपका, आपके मंत्री और आपके मित्र का साथ में नाम आना, ऐसे घिनौने अपराधी के साथ आपका नाम जुड़ा होना – ये शर्म की बात है।
आपने अमेरिका के साथ जो Trade deal की है, जिसमें आपने देश को बेच दिया – ये… pic.twitter.com/fLFJf4SjNC
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 23, 2026
ट्रेड डीलमुळे देशाचे नुकसान — काँग्रेसचा दावा
भारत-अमेरिका व्यापार करारावरील चर्चा सध्या वेग घेत असतानाच राहुल गांधी यांनी हे आव्हान दिले आहे. या करारामुळे देशाची अर्थव्यवस्था विदेशी कंपन्यांच्या ताब्यात जाईल, स्थानिक उद्योगांना फटका बसेल आणि आयात वाढल्याने घरगुती उत्पादकांचे मोठे नुकसान होईल, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेस पक्ष भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही कराराला विरोध करत राहील, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.





