Rahul Gandhi on voter list। संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आज सुरू झाला आहे. ४ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण १६ बैठका होणार आहेत. या काळात केंद्र सरकार वक्फसह सुमारे ३६ विधेयके मांडण्याची तयारी करत आहे. या अधिवेशनात सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्याचीच सुरुवात आज विरोधकांनी केली. “मतदार यादीवर चर्चाकरण्याची मागणी”Rahul Gandhi on voter list। देशात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विरोधकांनी अनेक आक्षेप घेतले होते. त्याचाच मुद्दा उपस्थित करत देशभरात मतदार यादीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, असे राहुल गांधी यांनी लोकसभेत सांगितले. संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र येऊन फक्त एवढेच म्हणत आहे की,”मतदार यादीवर येथे चर्चा झाली पाहिजे. यावर, विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना मतदार यादीवर बोलण्याची संधी देण्याची विनंती केली.” मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नसल्याने विरोधकांनी सभागृहात एकच गोंधळ केला. राहुल गांधी म्हणाले की, देशभरात मतदार यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यातील विरोधी पक्षांनी यावर एका सुरात प्रश्न उपस्थित केले आहेत. तत्पूर्वी, तृणमूल काँग्रेसचे सदस्य सौगत रॉय म्हणाले की,” मतदार यादीत काही विसंगती आहेत आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निदर्शनास आणून दिले. मुर्शिदाबाद आणि बर्दवान संसदीय मतदारसंघात आणि हरियाणामध्ये समान निवडणूक फोटो ओळखपत्र (EPIC) क्रमांक असलेले मतदार होते. कामकाज सुरु असताना विरोधकांचा गोंधळ Rahul Gandhi on voter list। दरम्यान, याअगोदर विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. मतदार ओळखपत्र क्रमांकांमधील तफावतीपासून ते मणिपूरपर्यंतच्या विविध मुद्द्यांवर चर्चेची मागणी विरोधी पक्ष करत होते. सभापतींनी विरोधी पक्षांना प्रश्नोत्तराचा तास काही काळ चालू ठेवण्याची विनंती केली, परंतु घोषणाबाजी सुरूच राहिली. अखेर लोकसभा अध्यक्षांनी काही काळासाठी कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतला. हेही वाचा जम्मू-काश्मीरमध्ये रमजानमध्ये ‘फॅशन शो’ आयोजित करणे पडले महागात ; अब्दुल्ला सरकारने दिले चौकशीचे