Rahul Gandhi On PM Modi : “आता देश चालवणे हे…” ; सोने खरेदी न करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनावर राहुल गांधींनी टीका
Rahul Gandhi On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.

Rahul Gandhi On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. त्यांनी लोकांना सोने खरेदी करणे टाळण्याचे, परदेश प्रवास कमी करण्याचे आणि पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ वाढवण्याचे आवाहनही केले आहे.
दरम्यान , त्यांच्या या आवाहनावर आता काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे उपदेश नाहीत, तर अपयशाचा पुरावा आहे.”असे म्हणत त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत, “काल मोदींनी जनतेकडून त्यागाची मागणी केली. सोने खरेदी करू नका, परदेश प्रवास करू नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खते आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा आणि घरून काम करा. हे उपदेश नाहीत—हा अपयशाचा पुरावा आहे.” Rahul Gandhi On PM Modi :
काँग्रेस नेते पुढे बोलताना म्हणाले, “गेल्या १२ वर्षांत देश अशा टप्प्यावर पोहोचला आहे की, जनतेला काय खरेदी करावे, काय खरेदी करू नये, कुठे जावे, कुठे जाऊ नये हे सांगावे लागत आहे. प्रत्येक वेळी, जबाबदारीतून सुटका करून घेण्यासाठी ते (पंतप्रधान) जबाबदारी जनतेवर ढकलतात. देश चालवणे आता एका तडजोड केलेल्या पंतप्रधानांच्या हातात राहिलेले नाही.”
दुनियाभर में आज जो चुनौतियां आई हैं, हमें उन्हें परास्त करना होगा। विदेशी मुद्रा बचाने के लिए जो भी रास्ते अपना सकते हैं, हमें उन्हें अपनाना होगा। pic.twitter.com/vyNUQNzFLF
— Narendra Modi (@narendramodi) May 10, 2026
हैदराबादमधील एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी लोकांना आवाहन करतो की, वर्षभर सोने खरेदी करू नका.” कोविड-१९ महामारीचा संदर्भ देत ते म्हणाले की, त्या काळात आपण ‘वर्क फ्रॉम होम’, ‘ऑनलाइन मीटिंग्ज’ आणि ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ यांसारख्या प्रणाली अवलंबल्या होत्या. आपल्याला त्यांची सवय झाली होती. आता काळाची गरज आहे की आपण पुन्हा त्या प्रणालींना प्राधान्य द्यावे.
ते म्हणाले की, इराण युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे. इंधनाची बचत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज खताची एक गोणी ३,००० रुपयांना विकली जात आहे. भारतात तीच गोणी शेतकऱ्यांना ३०० रुपयांना दिली जात आहे. Rahul Gandhi On PM Modi :





