“४ जूनला नवी पहाट होणार….” ; राहुल गांधींकडून मतदारांना आवाहन

Rahul Gandhi on Phase 7 Voting । लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सातव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या ५७ जागांवर मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 10.06 कोटी मतदार 904 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. त्यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदारांना मतदानासाठी आवाहन केले आहे.
४ जूनला नवी पहाट होईल Rahul Gandhi on Phase 7 Voting ।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशवासियांना सातव्या टप्प्यात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “प्रिय देशबांधवांनो, आज मतदानाचा सातवा आणि शेवटचा टप्पा आहे आणि आतापर्यंतच्या ट्रेंडवरून हे स्पष्ट होत आहे की देशात भारताचे सरकार स्थापन होणार आहे. मला अभिमान आहे की, कडक उन्हातही तुम्ही सर्व आहात. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी मतदान करण्यासाठी 4 जूनचा सूर्य देशात एक नवी पहाट घेऊन येणार आहे.” असे म्हणत राहुल गांधी यांनी त्यांच्या पक्षाच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
प्यारे देशवासियों!
आज सातवें और अंतिम चरण का मतदान है और अब तक के रुझानों से स्पष्ट है कि देश में INDIA की सरकार बनने जा रही है।
मुझे गर्व है कि झुलसा देने वाली गर्मी में भी आप सभी लोकतंत्र और संविधान की रक्षा के लिए वोट देने निकले हैं।
आज भी बड़ी संख्या में बाहर निकल कर…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 1, 2024
सर्व पक्षांना निकालाची प्रतीक्षा loksabha Phase 7 Voting ।
गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया सातव्या टप्प्यानंतर संपणार असून, 4 जून रोजी निकालाची प्रतीक्षा आहे. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातव्या टप्प्यात 5.24 कोटी पुरुष आणि 4.82 कोटी महिला मतदार सहभागी होत आहेत. त्याच बरोबर 3574 तृतीय लिंग मतदार देखील मतदान करत आहेत.





