राहुल गांधी आज गुजरात दौऱ्यावर; राजकोट गेम झोन दुर्घटनेतील पीडितांच्या कुटूंबांची घेणार भेट

Rahul Gandhi In Gujarat| काँग्रेस नेते राहुल गांधी आज शनिवारी गुजरात दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी ते राजकोट गेम झोन अपघात, मोरबी ब्रिज आणि सुरत अपघातातील पीडितांना भेटणार आहेत.
गुजरात काँग्रेस अध्यक्ष शक्ति सिंह गोहिल यांनी सांगितले की, ‘गुजरातमधून अनेक लोकांचे फोन आले आहेत, ज्यांना भाजपच्या राजवटीत अन्यायकारक वागणूक दिली गेली आहे. ते म्हणतात की राहुल गांधी न्यायासाठी लढतात. लोकांचा भाजपवर विश्वास होता, पण त्यांना न्याय मिळाला नाही, त्यामुळे राहुल गांधींसमोर त्यांचे म्हणणे मांडायचे आहे. आम्ही राहुल गांधींना त्या सर्व लोकांशी बोलण्याची विनंती केली आहे.’
कार्यक्रमाचे नियोजन कसे असणार ?
दरम्यान, राहुल गांधी दुपारी 1 वाजता काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर ते दुपारी 2.30 वाजता राजकोट गेमिंग झोन पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तसेच मोरबी पूल आणि सुरत आग दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार आहे. याशिवाय काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपच्या गुंडांनी हल्ला केला होता, त्यावेळी सरंक्षणासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या कुटुंबियाला देखील राहुल गांधी भेट देणार आहेत. Rahul Gandhi In Gujarat|
राहुल गांधींनी हाथरस येथेही दिली भेट
दरम्यान, राहुल गांधी काल ५ जुलै रोजी उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी राहुल गांधी यांनी पीडितांच्या कुटुंबाला पक्षाच्यावतीने मदत करणार असल्याचे आश्वासन दिले.
राहुल गांधी यापूर्वी भारत जोडो यात्रा-2 घेऊन गुजरातमध्ये पोहोचले होते. तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी गुजरातमध्ये एकही निवडणूक रॅली किंवा रोड शो केला नव्हता. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते आज राहुल गांधी गुजरातमध्ये दाखल होणार आहेत. Rahul Gandhi In Gujarat|
हेही वाचा:
अजित पवार पंढरपूर यात्रेत सहभागी होणार ; पायी चालण्याची स्वतः केली घोषणा





