Rahul Gandhi on Election Commission। बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादी एसआयआर प्रक्रियेविरुद्ध विरोधी पक्षांनी गुरुवारी संसद भवनाबाहेर निदर्शने केली. यावेळी, माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी,”निवडणूक आयोगाचे विधान मूर्खपणाचे असल्याचे म्हटले”. पुढे बोलताना त्यांनी, “ही खूप गंभीर बाब आहे, निवडणूक आयोग भारतीय निवडणूक आयोगाप्रमाणे काम करत नाही” असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी,”आज त्यांनी काही विधान केले आहे, हे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे. वस्तुस्थिती अशी आहे की निवडणूक आयोग आपले काम करत नाही. कर्नाटकातील एका जागेवर निवडणूक आयोगाने फसवणूक करण्यास परवानगी दिल्याचे समोर आले आहे. आमच्याकडे १००% पुरावे आहेत. आम्ही फक्त एका मतदारसंघाकडे पाहिले आणि आम्हाला पुरावे सापडले” असा मोठा दावा देखील त्यांनी यावेळी केला. आम्ही तुम्हाला पळून जाऊ देणार नाही Rahul Gandhi on Election Commission। ते बोलताना राहुल गांधी यांनी, “मला पूर्ण खात्री आहे की अशा प्रकारचे नाटक बसून बसून केले गेले आहे. हजारो नवीन मतदार जोडले गेले आहेत, ज्यांचे वय ४० ते ६० वर्षे आहे. याशिवाय मतदार वगळण्यात आले आहेत. मी निवडणूक आयोगाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही, तुमचे अधिकारी यातून सुटतील तर तुम्ही चुकत आहात.” असेही त्यांनी म्हटले. बिहार निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा पर्याय खुला Rahul Gandhi on Election Commission। बिहारमधील मतदार यादीतील एसआयआरवरील वादाच्या पार्श्वभूमीवर, आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा त्यांच्या पक्षाकडे “पर्याय” आहे, असे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी गुरुवारी सांगितले. निवडणूक आयोग सरकारचे “राजकीय हत्यार” म्हणून काम करत असल्याने बिहारमध्ये एनडीए एसआयआर मतदार यादीच्या समर्थनार्थ बाहेर पडला आहे, असा आरोपही त्यांनी केला.