राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपदासाठी पात्र नाहीत – भाजप
Updated On:

नवी दिल्ली – संसदेच्या आवारातील अभूतपूर्व गोंधळाचा ठपका भाजपने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर ठेवला. राहुल यांचे वर्तन विचारात घेता ते सध्या सांभाळत असलेल्या पदासाठी पात्र नाहीत, असे टीकास्त्र त्या पक्षाने सोडले.
शिवराजसिंह चौहान आणि पियूष गोयल या केंद्रीय मंत्र्यांनी भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन राहुल यांना लक्ष्य केले. संसदेत शारीरिक बळाचा वापर करणार का? देशाची लोकशाही कॉंंग्रेस कुठल्या दिशेने नेत आहे? संसदेत घडले ते अकल्पनीय आहे. राहुल यांनी भाजपच्या खासदारांना ढकलले. त्यांचे वर्तन असभ्य प्रकारातील होते. तसे वर्तन सुसंस्कृत समाजाला शोभणारे नाही, असे चौहान यांनी म्हटले.





