Rahul Gandhi : राहुल गांधी परदेश दौऱ्यावर रवाना ! नेते, विद्यार्थी, व्यावसायिकांशी साधणार संवाद
Updated On:

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. ते दक्षिण अमेरिकेतील ४ देशांना भेट देणार आहेत. त्यावेळी ते राजकीय नेते, विद्यापीठांमधील विद्यार्थी आणि व्यावसायिकांशी संवाद साधतील.
कॉंग्रेसचे नेते पवन खेडा यांनी राहुल यांच्या परदेश दौऱ्याविषयीची माहिती दिली. मात्र, त्यांनी राहुल नेमक्या कुठल्या देशांना भेट देणार आणि त्यांचा दौरा किती दिवसांचा असणार याविषयीचा तपशील नमूद केला नाही.
कॉंग्रेसमधील सुत्रांनी सूचित केल्यानुसार राहुल ब्राझील, कोलंबियाला जाणार आहेत. त्यांच्या परदेश दौऱ्याचे पुन्हा राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. याआधी राहुल यांनी परदेश दौऱ्यांवेळी मांडलेल्या विविध मुद्द्यांवर भाजपने तीव्र आक्षेप घेतला होता.





