Delimitation Bill : शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी INDIA आघाडीचे नेते मैदानात
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावरून विरोधी पक्षांच्या आघाडीत मतभेद निर्माण झाले असताना शरद पवार यांची भूमिका बदलण्यासाठी INDIA आघाडीतील दिग्गज नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावरून विरोधी पक्षांच्या आघाडीत मतभेद निर्माण झाले असताना शरद पवार यांची भूमिका बदलण्यासाठी INDIA आघाडीतील दिग्गज नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते रविवारी मुंबईत दाखल झाले आहेत. शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करण्याची विनंती करण्याचा या नेत्यांचा प्रयत्न आहे. (Delimitation Bill)
स्टॅलिन यांच्यानंतर आता शरद पवारांची भेट
डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका द्रमुक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने घेतल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्वाने मित्रपक्षांशी चर्चा सुरू केली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आधी तामिळनाडूचे द्रमुक प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेण्यात आली. त्यानंतर मुंबईत शरद पवार यांची भेट घेण्याचे नियोजन करण्यात आले. (Delimitation Bill)
या शिष्टमंडळात राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह विविध विरोधी पक्षांचे नेते सहभागी आहेत. (Delimitation Bill)
ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार दाखल
शरद पवार सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे INDIA आघाडीचे नेते त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात जाणार असल्याचे वृत्त आहे. या भेटीत डिलिमिटेशन विधेयकाबाबत पक्षाने घेतलेल्या भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. (Delimitation Bill)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने सुधारित प्रस्तावाला पाठिंबा दर्शविल्याने विरोधी आघाडीत नाराजी निर्माण झाली आहे. काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शरद पवार यांची भूमिका बदलते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Delimitation Bill)
डिलिमिटेशन विधेयकावर विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न
संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक मांडले जाणार आहे. हे विधेयक मंजूर होऊ नये, यासाठी विरोधी पक्षांकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे. (Delimitation Bill)
राहुल गांधी आणि काँग्रेस नेतृत्वाने मित्रपक्षांना विधेयकाच्या विरोधात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, द्रमुक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भूमिकेमुळे विरोधकांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. (Delimitation Bill)
आता शरद पवार यांच्याशी होणाऱ्या चर्चेतून काय निष्पन्न होते आणि त्यांचा पक्ष मतदानावेळी कोणती भूमिका घेतो, हे संसदेतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरणार आहे. (Delimitation Bill)





