Rahul Gandhi Indore Visit : राहुल गांधी इंदूरमध्ये दाखल; स्वागतासाठी विमानतळाबाहेर गर्दी, काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की
Rahul Gandhi Indore Visit : राहुल गांधी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमासाठी इंदूरमध्ये दाखल झाले. स्वागतासाठी झालेल्या गर्दीत काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली.

Rahul Gandhi Indore Visit : काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रणात आणताना पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. परिस्थिती काही वेळात नियंत्रणात आली.
विमानतळावर मध्य प्रदेश काँग्रेसच्या सुमारे ६० नेत्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. यामध्ये आमदार, माजी आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी सहभागी होते. त्यानंतर राहुल गांधी यांचा ताफा हॉटेल रेडिसनकडे रवाना झाला. येथे प्रदेशातील प्रमुख काँग्रेस नेत्यांसोबत कार्यक्रमाच्या तयारीबाबत बैठक झाली.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या विरोधात इंदूरमधील काही भागांत ‘झूठ की गूंज पर होगी सत्य की विजय’ असे पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर कोणी लावले, हे स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसचे नगरसेवक राजू भदौरिया यांनी समर्थकांसह काही पोस्टर हटवले.
इंदौर का जोश हाई है, जननायक की आँधी आई है!
इक्कीसवीं सदी के जननायक राहुल गांधी जी के स्वागत के लिए इंदौर तैयार है! इंदौर की धरती से फिर एक बार क्रांति की आवाज गूँजेगी।
19 सितंबर, 2026
📍भारत जोड़ो मैदान, इंदौर@RahulGandhi @INCIndia @INCMP
#RahulGandhi #ChhatronKiGoonj #Indore
#US12825— Umang Singhar (@UmangSinghar) September 19, 2026
राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता इंदूरमधील रीजनल पार्कसमोरील मैदानावर होणार आहे. यामध्ये विद्यार्थी आणि तरुणांशी शिक्षण, रोजगार आणि भविष्यासंदर्भात संवाद साधला जाणार आहे.






