राहुल गांधींचा कोल्हापुरातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल ; पहा व्हिडिओत कोणासोबत स्वयंपाक बनवत आहेत?

Rahul Gandhi in Kolhapur। राज्यात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत.त्यातच राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोल्हापूरातील अजय तुकाराम सनदे आणि अंजना तुकाराम सानदे या दलित कुटुंबाच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला आहे. यावेळी राहुलने त्यांच्या चक्क किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करतानाही हात आजमावला. याविषयी राहुल गांधी यांनी, “आजही दलित किचनबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. शाहू पाटोळे यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘दलित काय खातात हे कोणालाच माहीत नाही.” असे त्यांनी म्हटले.
राहुल गांधींनीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जेवताना राहुल गांधी मी जास्त मिरची खात नसल्याचे सांगताना दिसत आहेत. तसेच जेवणात किती तिखट टाकले? असा सवाल देखील करताना दिसत आहेत.
दलित किचन के बारे में आज भी बहुत कम लोग जानते हैं। जैसा शाहू पटोले जी ने कहा, “दलित क्या खाते हैं, कोई नहीं जानता।”
वो क्या खाते हैं, कैसे पकाते हैं, और इसका सामाजिक और राजनीतिक महत्व क्या है, इस जिज्ञासा के साथ, मैंने अजय तुकाराम सनदे जी और अंजना तुकाराम सनदे जी के साथ एक दोपहर… pic.twitter.com/yPjXUQt9te
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 7, 2024
दलित काय खातात हे कोणालाच माहीत नाही Rahul Gandhi in Kolhapur।
राहुल गांधी यांनी या संदर्भात व्हिडिओ शेअर करताना, “आजही फार कमी लोकांना दलित किचनबद्दल माहिती आहे. शाहू पाटोळे जी म्हटल्याप्रमाणे दलित काय खातात हे कोणालाच माहीत नाही. ते काय खातात, ते कसे शिजवतात आणि त्याचे सामाजिक आणि राजकीय महत्त्व याबद्दल उत्सुकतेने मी अजय तुकाराम सानदे आणि अंजना तुकाराम सानदे यांच्यासोबत एक दुपार घालवली.” असे म्हटले.
बहुजनांच्या अधिकाराचे आम्ही रक्षण करू Rahul Gandhi in Kolhapur।
पुढे राहुल गांधी यांनी, “त्यांनी मला आदरपूर्वक महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या त्याच्या घरी बोलावले आणि स्वयंपाकघरात मदत करण्याची संधी दिली. आम्ही मिळून हरभऱ्याची भाजी आणि वांग्याची तूर डाळ तयार केली. पाटोळे जी आणि सनदे कुटुंबीयांच्या जाती आणि भेदभावाच्या वैयक्तिक अनुभवांबद्दल बोलताना, आम्ही दलित आहाराबद्दल जागरूकता नसणे आणि या संस्कृतीचे दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्व यावर चर्चा केली. संविधानाने बहुजनांना वाटा आणि अधिकार दिले आहेत आणि त्या संविधानाचे आम्ही रक्षण करू. पण समाजात खरी सर्वसमावेशकता आणि समानता तेव्हाच शक्य होईल जेव्हा प्रत्येक भारतीय बंधुत्वाची भावना मनात ठेवून प्रयत्न करेल.





