“महाराष्ट्राप्रमाणे बिहारची मते चोरण्याचा प्रयत्न” ; मतदार पडताळणीवरून राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा

Rahul Gandhi in jam । बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडून चालवल्या जाणाऱ्या विशेष सघन सुधारणा (SIR) मोहिमेविरुद्ध आज महाआघाडीने राज्यव्यापी चक्का जामची हाक दिली आहे. यामध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस, डावे पक्ष, व्हीआयपी पार्टी आणि जन अधिकार पार्टी (पप्पू यादव) यासह महाआघाडीतील सर्व घटक पक्ष या निषेधात सहभागी आहेत. दरम्यान, या आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी देखील सहभागी झले आहेत. त्यांनी पाटण्यात तेजस्वी यादव यांच्यासोबत ते आयकर चौकापासून निवडणूक कार्यालयापर्यंत मोर्चाचे नेतृत्व केले यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.
महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही मते चोरण्याचे प्रयत्न Rahul Gandhi in jam ।
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरु असणारा मोर्चा विधानसभेसमोर थांबवण्यात आला. ज्याठिकाणी राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी यावेळी बोलताना, ‘महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही निवडणुका, मते चोरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक आयोग हे विसरला आहे की त्यांचे काम संविधानाचे रक्षण करणे आहे आणि कोणत्याही पक्षासाठी काम करणे नाही. निवडणूक आयोगाचे काम भाजपसाठी काम करणे नाही तर संविधानाचे रक्षण करणे आहे. निवडणूक आयोग आपले काम करत नाही.” असे म्हणत त्यांनी सरकारसह आयोगाला खडेबोल सुनावले.
पुढे कार्यकर्त्यांना संबोधित करताना तेजस्वी यादव यांनी, ‘मोदीजी आणि नितीश कुमार यांच्या सूचनेनुसार मतदार यादीतून गरिबांची नावे वगळली जात आहेत. मोदीजी आणि नितीशकुमारजींची ही ‘दादागिरी’ चालणार नाही.” असे म्हणत केंद्र आणि राज्य सरकारला ठणकावले. पुढे बोलताना तेजस्वी यांनी, ‘कोणत्या बिहारींना मतदान करायचे आणि कोणाला नाही हे दोन गुजराती ठरवतील का?’ हे लोक संविधानाशी छेडछाड करत आहेत. आम्ही गप्प बसणार नाही.” असे त्यांनी म्हटले.
तेजस्वी आणि राहुल बिहारमध्ये काहीही करू शकत नाहीत Rahul Gandhi in jam ।
तर दुसारिकडे विरोधकांच्या या निषेध मोर्चावर प्रतिक्रिया देताना, भाजप आमदार हरिभूषण ठाकूर यांनी, ‘हे लोक शहाबुद्दीन अमर रहें म्हणतील. असे लोक संविधानाचे रक्षण करू शकत नाहीत. तेजस्वी आणि राहुल बिहारमध्ये काहीही करू शकत नाहीत. जनता त्यांच्यासोबत नाही. जनता सगळं पाहत आहे” असे म्हणत पलटवार केला.
-बिहारमधील चक्का जाम दरम्यान, काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पाटण्याला पोहोचले आहेत, जिथे ते तेजस्वी यादव यांच्या मोर्चात सामील झाले. हा मोर्चा ईडी कार्यालयापर्यंत जाईल.





