Rahul Gandhi : ट्रम्प यांच्यासमोर गुडघे टेकू नका; राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर टीका
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी पुन्हा एकदा यूपीआय व्यवहारांसाठी केंद्राच्या नवीन मर्चंट डिस्काउंट रेट फ्रेमवर्कवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी पुन्हा एकदा यूपीआय व्यवहारांसाठी केंद्राच्या नवीन मर्चंट डिस्काउंट रेट फ्रेमवर्कवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
त्यांनी सरकारवर अमेरिकेच्या दबावाखाली झुकल्याचा आरोप केला आणि पीएम मोदींना ‘हिंमत दाखवण्यास’ सांगितले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, राहुल यांनी नवीन यूपीआय चार्जवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली.
राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, एकदा इंदिराजींना विचारण्यात आले होते की, त्यांचा कल डावीकडे आहे की उजवीकडे. यावर त्यांचे उत्तर होते, मी ना डावीकडे झुकते ना उजवीकडे. मी सरळ उभी राहते. यानंतर त्यांनी यूपीआय फ्रेमवर्कचा उल्लेख करत आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वेगळा मार्ग निवडला आहे.
मोदीजींचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे, ते ना डावीकडे आहेत ना उजवीकडे, तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर (Rahul Gandhi) पूर्णपणे सरेंडर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यूपीआयवर टॅक्स लावून प्रत्येक भारतीयावर टॅक्सचा बोजा टाकला आहे आणि अमेरिकेला मोठी रक्कम दिली आहे.मोदीजी, कृपया अमेरिकेसमोर सरेंडर करण्याचे बंद करा. हिंमत दाखवा, उभे राहा आणि यूपीआय टॅक्स मागे घ्यावा, अशी मागणी केली.
दरम्यान, काँग्रेसने नवीन एमडीआरला मोदी टॅक्स संबोधत आरोप केला होता की, हा निर्णय अमेरिकेच्या दबावाखाली घेण्यात आला होता. पक्षाने हे धोरण लागू करण्याच्या सरकारच्या पद्धतीवरही टीका केली आहे.






