“मोदींची प्रतिमा नष्ट झालीय…” ; निकालानंतरच्या पहिल्याच मुलाखतीत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

Rahul Gandhi Attack On PM । काँग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक निकालानंतर एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी, “मोदींची प्रतिमा नष्ट झाली आहे. मोदींची विचारधारा नष्ट झाली आहे.असे म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यासोबतच “भाजपची मूळ रचना आणि धार्मिक वैमनस्य पसरवणारी त्यांची विचारधारा या निवडणुकीत पूर्णपणे कोलमडलीय.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
मुलाखतीदरम्यान राहुल गांधी यांनी, “नरेंद्र मोदी सरकारला टिकण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. या निवडणुकांच्या अनपेक्षित निकालानंतर भारताच्या राजकीय परिस्थितीमध्ये बदल झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला टिकण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.” असेही त्यांनी यावेळी म्हटले
मोदी गटात असंतोष पसरलाय Rahul Gandhi Attack On PM ।
निकालाचा संदर्भ देताना, रायबरेलीचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, जागांची संख्या इतकी नाजूक आहे की, एक छोटीशी चूक सरकारला पाडू शकते. एक मित्रपक्ष दुसरीकडे वळताच सरकार पडू शकते, अशी परिस्थिती आहे. मोदी छावणीत प्रचंड असंतोष असून त्यांच्या संपर्कात असलेले अनेक लोक असल्याचा दावा राहुल यांनी केला. मात्र, राहुल गांधी यांनी याबाबत अधिक माहिती दिली नाही.
द्वेष पसरवणारी विचारधारा जनतेने नाकारली Rahul Gandhi Attack On PM ।
इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी, “ही विचारधारा अशी आहे की तुम्ही द्वेष पसरवाल, राग पसरवाल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. भारतातील जनतेने या निवडणुकीत ही विचारधारा नाकारली. ते म्हणाले, “यावेळी सत्ताधारी युती संघर्ष करेल, कारण 2014 आणि 2019 मध्ये नरेंद्र मोदींसाठी जे काम होते ते काम त्यांनी केले नाही.”अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
राहुल गांधी यांनी मुलाखतीत दावा केला की, “योग्य परिस्थितीत विरोधी इंडिया आघाडीला निर्विवाद बहुमत मिळाले असते. ते म्हणाले, आम्ही हात बांधून निवडणूक लढवली. पण जनतेने आम्हाला साथ दिली.असे म्हणत जनतेचे आभार देखील त्यांनी यावेळी मानले.





