राहुल द्रविडच्या कारला लोडिंग रिक्षाने दिली धडक, दोघांमध्ये जोरदार बाचाबाची, व्हीडिओ व्हायरल

Rahul Dravid: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी तो खेळामुळे नव्हे, तर एका ऑटो चालकासोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर द्रविडचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये दिसत आहे की, लोडिंग ऑटोसोबत झालेल्या अपघातानंतर द्रविड चालकासोबत वाद घालत आहेत.
राहुल द्रविड आणि या ऑटो चालकाचा वाद झालेला व्हीडिओ बंगळुरूमधील असल्याचे सांगितले जात आहे. व्हीडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावर उभी असलेल्या राहुल द्रविडच्या एसयूव्ही कारला मागून येणाऱ्या एका लोडिंग ऑटोने अचानक धडक दिली. त्यानंतर द्रविड ऑटो चालकावर चांगलाच संतापलेला दिसला. या घटनेचे काही व्हीडिओही व्हायरल होत आहेत. द्रविड आणि ऑटो चालकामध्ये बाचाबाची होत असल्याचे व्हीडिओमध्ये दिसत आहे.
Rahul Dravid’s Car touches a goods auto on Cunningham Road Bengaluru #RahulDravid #Bangalore pic.twitter.com/AH7eA1nc4g
— Spandan Kaniyar ಸ್ಪಂದನ್ ಕಣಿಯಾರ್ (@kaniyar_spandan) February 4, 2025
ही घटना बंगळुरूच्या हाय ग्राउंड्स ट्रॅफिक पोलिस स्टेशन परिसरात घडली. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही पोलिस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. राहुल द्रविड इंडियन एक्सप्रेस सर्कलहून हाय ग्राउंड्सकडे जात असताना मागून येणाऱ्या लोडिंग ऑटोने त्याच्या कारला धडक दिली, ज्यामुळे कारचे काही प्रमाणात नुकसान झाले.
याबाबत माहिती देताना एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ही एक छोटीशी घटना होती. जी घटनास्थळीच सोडवता येऊ शकत होती. अद्याप प्रकरणात आम्हाला कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तसेच, द्रविडने या ऑटो चालकाचा मोबाइल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर देखील घेतल्याचे सांगितले जाते.





