Rahul Dravid Injured ahead IPL 2025 : राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या दुखापतग्रस्त आहेत. असे असूनही, तो संघाच्या नेट सत्रांना उपस्थित राहत अहेत. याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. यामध्ये, राहुल द्रविड गोल्फ कार्टवर स्वार होऊन मैदानावर पोहोचत आहे. त्याच्या पायावर प्लास्टर आहे. तो कुबड्यांच्या मदतीने गोल्फ कार्टमधून उतरत आहे. यानंतर, तो संघाशी बोलत आहे. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. राहुल द्रविडचं होतय कौतुक – राहुल द्रविडच्या या कृतीचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. व्हिडीओमध्ये द्रविड गोल्फ कार्टवर बसून येत असल्याचे दिसत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. यानंतर तो खाली उतरतो आणि कुबड्यांच्या मदतीने नेटकडे जातो आणि खेळाडूंशी हस्तांदोलन करतो. यानंतर, तो बसून खेळाडूंचा सराव पाहतो. यानंतर रियान पराग देखील त्याच्यासोबत थोडी मजा करतो. तो परागला काही फलंदाजीच्या टिप्स देखील देतो. यानंतर यशस्वी जैस्वाल आणि तुषार देशपांडे देखील द्रविडसोबत चर्चा करताना दिसतो. राहुल द्रविडला दुखापत कशी झाली? https://twitter.com/rajasthanroyals/status/1900035019609117001 हे उल्लेखनीय आहे की अलिकडेच राहुल द्रविडला क्रिकेट खेळताना दुखापत झाली होती. हा सामना कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या ग्रुप ३ लीगचा उपांत्य सामना होता. द्रविड त्याचा १६ वर्षांचा मुलगा अन्वयसोबत हा सामना खेळण्यासाठी गेला होता. दोघेही विजया क्रिकेट क्लबकडून खेळत होते. डावाच्या १८ व्या षटकात एक धाव घेण्याच्या प्रयत्नात द्रविडच्या स्नायूंना दुखापत झाली. यानंतर त्याला बाहेर नेण्यात आले. या सामन्यात द्रविडने २८ चेंडूत २९ धावा केल्या आणि सहा चौकार मारले. त्याचा मुलगा अन्वयने २२ धावा केल्या. हेही वाचा –Champions Trophy 2025 : “आयसीसीने आम्हाला आरसा दाखवला…”, कामरान अकमलने पाकिस्तान संघाचे काढले वाभाडे; म्हणाला, “लहान संघांनीही आम्हाला…” राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना २३ मार्चला खेळला जाणार – आयपीएलच्या १८ व्या हंगामात, राजस्थान रॉयल्स संघ संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल, ज्यामध्ये यावेळी त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये काही नवीन चेहरे देखील दिसतील. राजस्थान रॉयल्सचा हंगामातील पहिला सामना २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. यानंतर, राजस्थानला त्यांचे पुढील २ सामने गुवाहाटी मैदानावर खेळायचे आहेत, जे कोलकाता आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध असतील.