आजीला पाहताच राहा झाली खुश; आलिया आणि रणबीरच्या लेकीचा क्युट व्हिडिओ व्हायरल

Raha kapoor Viral Video | अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा विमानतळावरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या दोघांसोबत लेक राहा देखील होती. एअरपोर्टवर पापाराझींनी राहाचे काही फोटो आणि व्हिडिओ क्लिक केले आहेत. यावेळी राहाने सगळ्यांचा लक्ष वेधून घेतले. सध्या तिचा हा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत दिसते की, आलिया आणि रणबीर मुंबई एअरपोर्टवर आहेत, एअरपोर्टच्या आतमध्ये एन्ट्री करत असताना राहा आलियाच्या कडेवर होती. पापाराझीला पाहताच राहानं सुरुवातीला हाय केलं, नंतर आलिया तिच्याशी बोलू लागली. त्यानंतर आलिया आणि रणबीर एअरपोर्टच्या गेटवर असतानाच नीतू कपूरसुद्धा तिथे पोहोचल्या होत्या.
आजीला पाहताच राहा आनंदाने टाळ्या वाजवू लागली होती. त्यानंतर बोबड्या भाषेत ती त्यांच्याशी बोलू लागली. सध्या राहाचा हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. दरम्यान, आलिया, रणबीर, नीतू आणि राहा कपूर हे व्हॅकेशनसाठी परदेशात जात असल्याचं म्हटलं जात आहे. Raha kapoor Viral Video |
View this post on Instagram
आलिया आणि रणबीरने 14 एप्रिल 2022 रोजी लग्न केलं होतं. लग्नाआधी दोघं जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. लग्नाच्या आठ महिन्यांनी आलियाने मुलीला जन्म दिला. गेल्या वर्षी आलिया आणि रणबीरने राहाला पापाराझींसमोर आणले आणि तिचा चेहरा पहिल्यांदा दाखवला. ख्रिसमसनिमित्त कपूर कुटुंबीय एकत्र येतात. त्यावेळी रणबीर आणि आलिया राहाला घेऊन पापाराझींसमोर आले होते. राहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. Raha kapoor Viral Video |
दरम्यान, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात आलिया भट्ट काम करणार असल्याचंही समोर आले आहे. तसेच रणबीर कपूर आणि विकी कौशल यांची नावं जाहीर झाली. यात रणबीर आणि विकी लष्करी अधिकाऱ्यांच्या भूमिकांमध्ये दिसतील, तर आलिया या दोघांचा ‘लव्ह इंटरेस्ट’ असणार आहे. या सिनेमाचं चित्रीकरण येत्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे.
हेही वाचा:
शेअर बाजारात सेन्सेक्सने 83,184 चा नवा उच्चांक गाठला ; निफ्टीनेही पार केले नवीन शिखर





