Raghuraj Singh । उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री रघुराज सिंह यांनी होळीबाबत वादग्रस्त विधान केले आहे. योगी सरकारमधील कामगार आणि सेवा नियोजन विभागाचे राज्यमंत्री रघुराज सिंह यांनी,”मुस्लिम लोकांनी हिजाब घालावे जेणेकरून त्यांची टोपी आणि शरीर रंगापासून सुरक्षित राहील.” असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुस्लिम महिलांप्रमाणे पुरुषांनींही हिजाब घालावा Raghuraj Singh । रघुराज सिंह यांनीहोळीवरून सुरु झालेल्या वादावर बोलताना, “होळीच्या वेळी ज्यांना रंग टाळायचे आहेत त्यांनी मुस्लिम महिलांप्रमाणे पुरुषांनींही हिजाब घालावा, जेणेकरून त्यांची टोपी आणि शरीर सुरक्षित राहील, अन्यथा त्यांनी घरीच राहावे.” असे वादग्रस्त विधान केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले,”होळीच्या वेळी अशांतता निर्माण करणाऱ्यांसाठी तीन ठिकाणे आहेत; तुरुंगात जा किंवा राज्य सोडा नाहीतर यमराजासोबत तुमचे नाव लिहा.” असे त्यांनी म्हटले. रघुराज सिंह एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी राज्यातील अलीगढच्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठात मंदिर बांधण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. रघुराज सिंह म्हणाले की, “एएमयूमध्ये मंदिर बांधले जाईल, या लोकांनी बहुसंख्य लोकांचा आदर केला पाहिजे”. ते म्हणाले की, “मी एएमयूमध्ये राम मंदिर बांधण्याची मागणी करतो. जर ते बांधले गेले तर मी पहिली वीट घालेन. तिथे तुम्ही मंदिरासाठी सर्वस्व अर्पण करू शकता.”असेही त्यांनी म्हटले. अनुज चौधरी यांचे विधान ज्याने गोंधळ घातला Raghuraj Singh । यावेळी रमजानचा दुसरा शुक्रवार आणि होळी एकाच दिवशी आहेत. याबाबत संभळमधील सीओ अनुज चौधरी यांनी विधान केले होते की,”होळी वर्षातून एकदा येते आणि शुक्रवार ५२ वेळा येतो. अशा परिस्थितीत, ज्यांना रंगाची समस्या आहे त्यांनी घरीच राहावे.” असे म्हटले होते. संभल सीओच्या या विधानानंतर प्रतिक्रियांचा पूर आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही संभल सीओच्या विधानाचा पुनरुच्चार केला आणि ते म्हणाले की, “अधिकारी एक पैलवान आहे आणि पैलवानांसारखे बोलेल.” योगी सरकारमधील मंत्री गुलाबो देवी यांनीही संभल सीओ अनुज चौधरी यांच्या विधानाचे समर्थन केले आणि शनिवारी सांगितले की “प्रत्येक धर्माचे सण शांततेत साजरे केले पाहिजेत आणि त्यात कोणत्याही प्रकारचा जातीयवाद नसावा.” गुलाबो देवी म्हणाल्या की, “भाजप सरकार नेहमीच असे इच्छिते की १२ सण यावेत किंवा आमचा एकच सण यावा, सर्व शांततेत साजरे केले पाहिजेत. समाजात एकता आणि सौहार्दाची भावना निर्माण झाली पाहिजे. “