Raghav Juyal : राघव जुएलने दिली प्रेमाची कबुली? शेअर केले फोटो
Raghav Juyal Girlfriend: राघवचे नाव शेहनाज गिलसोबतही जोडले गेले होते

Raghav Juyal : अभिनेता आणि डान्सर राघव जुएलने (Raghav Juyal) सोशल मिडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. राघव प्रसिद्ध अभिनेत्री निहारीकाला डेट करत असल्याचं दिसतं.
निहारिका आणि राघवचा हा फोटो समोर येताच चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. परंतु अनेकांना हे दोघे एका आगामी सिनेमासाठी किंवा म्युझिक व्हिडीओसाठी एकत्र येत आहेत, अशी शक्यता वर्तवली आहे. (Raghav Juyal)
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंनी चाहत्यांना विचार करण्यास भाग पाडले आहे की, दोघे खरंच एकमेकांना डेट करत आहेत की हा त्यांच्या आगामी ‘भाई तेरा स्टार है’ या चित्रपटाचा प्रमोशनल स्टंट आहे. (Raghav Juyal)
View this post on Instagram
या चित्रपटात संजय कपूर, निकी वालिया, विवान भटेना आणि बरखा सिंह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. यापूर्वी राघवचे नाव शेहनाज गिलसोबतही जोडले गेले होते, परंतु दोघांनीही कधी या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. (Raghav Juyal)
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये निहारिका लाल रंगाच्या स्वेटशर्टमध्ये दिसत आहे, तर राघवने राखाडी रंगाचे जॅकेट घातलेले दिसत आहे. एका फोटोमध्ये राघवने पाठीमागून निहारिकाला मिठी मारली असून दोघेही हसताना दिसत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये केवळ हार्ट आणि स्टार इमोजीचा वापर करण्यात आला आहे. (Raghav Juyal)
राघवची गर्लफ्रेंड निहारिका एक अभिनेत्री आहे. निहारिकाने साऊथ फिल्मसमध्ये काम केलं. राघव आणि निहारिका अनेक पार्टी आणि इव्हेंटमध्ये स्पॉट झाले आहेत. परंतु त्यांच्या नात्याविषयी कोणालाच कल्पना नव्हती. अखेर आज दोघांनी रोमँटिक फोटो पोस्ट करून सर्वांना ही माहिती दिली. परंतु याबाबतही अनेक तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा:





