Raaka Film: अल्लू अर्जुनच्या ‘राका’ चित्रपटात 3 लोकप्रिय अभिनेत्री दिसणार खास भूमिकेत
Raaka Film: 'राका' चित्रपट डिसेंबर २०२७ मध्ये प्रदर्शित होणार

Raaka Film: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘राका’ चित्रपट सध्या तुफान चर्चेत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत दीपिका पदुकोण, रश्मिका मंदाना आणि जान्हवी कपूर यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्री पाहायला मिळणार आहेत.
चित्रपटाबाबत आधीपासूनच प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. शाहरूख खानचा ‘जवान’ चित्रपट बनवणारे दिग्दर्शक ॲटली या खास चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
या चित्रपटातील अभिनेत्रींच्या भूमिकेबद्दल माहिती समोर आली आहे. दीपिकाच्या भूमिकेबद्दल सांगायचे तर, ती चित्रपटात एका गरोदर स्त्रीच्या भूमिकेत दिसेल, जी स्वतःच्या अस्तित्वासाठी लढा देते.
विशेष म्हणजे, दीपिका खऱ्या आयुष्यातही सध्या प्रेग्नंट असून तिने आधीच तिचे शूटिंग पूर्ण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी कपूर या चित्रपटात एका आदिवासी राणीची भूमिका साकारत आहे. तर रश्मिका मंदाना एका गाईडच्या भूमिकेत असेल, जिचा संबंध थेट दीपिका पदुकोणच्या पात्राशी जोडलेला असेल.
गरोदर असलेल्या दीपिकाच्या पात्राचे रक्षण करण्याची जबाबदारी तिच्यावर असेल, असे मानले जात आहे. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. या तिन्ही अभिनेत्रींच्या कथांमध्ये अल्लू अर्जुनचे ‘राका’ हे पात्र सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे. एका वेगळ्या युगाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट असून प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
रिपोर्टनुसार, हा चित्रपट डिसेंबर २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘पुष्पा २’नंतर अल्लू अर्जुनचा हा पुढील मोठा प्रोजेक्ट आहे. सध्या चित्रपटाचे काम वेगाने सुरू आहे.
हेही वाचा:






