स्टार किड्ससोबत लेकाची तुलना केल्याने आर माधवन नाराज; म्हणाला “मला अजिबात…”

R. Madhavan on Nepotism| बॉलिवूड अभिनेता आर. माधवनचा नुकताच ‘शैतान’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. यातील आर माधवनच्या अभिनयाचे देखील सर्वत्र कौतुक केले जात आहे. या चित्रपटातील आपल्या दमदार भूमिकेने अभिनेत्याने चाहत्यांना खूप प्रभावित केले आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्याने मुलगा वेदांतची बॉलिवूडच्या इतर स्टार किड्ससोबत होणाऱ्या तुलनेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, वेदांतबद्दल सोशल मीडियावर अनेकदा चर्चा होत असते. अभिनेत्याचा मुलगा बॉलिवूडच्या इतर स्टार किड्सशी स्पर्धा करू शकेल का? आर माधवनने त्यांचा मुलगा वेदांत आणि इतर स्टार किड्स यांच्यातील होणाऱ्या तुलनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
आर माधवनने व्यक्त केली नाराजी R. Madhavan on Nepotism|
एका मुलाखतीदरम्यान आर माधवनला त्याचा मुलगा वेदांतची बॉलिवूड स्टार किड्सशी तुलना करण्याबद्दल विचारण्यात आले. त्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना अभिनेता म्हणाला- ‘आम्हाला हे अजिबात आवडत नाही. एका मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करणे हे चुकीचे आहे. हे पाहून मला आणि सरिताला (आर.माधवनची पत्नी) खूप त्रास होतो. अनेक वेळा मीम्स बनवण्यासाठी लोक अशा गोष्टी लिहितात ज्या वाचून आम्ही निराशा होते. ते इतरांचे किती नुकसान करत आहेत हे लोकांना कळत नाही. कोणत्या एका मुलाची तुलना दुसऱ्या मुलासोबत करणं योग्य नाही.’
‘मी माझ्या मुलाला इतर स्टार किड्सपेक्षा वेगळं समजतो. वेदांत हा जलतरणपटू आहे, माझ्या मुलाने त्याच्या मेहनतीने जे मिळवले आहे ते मी हिरावून घेऊ शकत नाही. त्याला खेळ आवडतात. त्याच्या उत्तम कामगिरीसाठी त्याला अनेक पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. वेदांतकडे राष्ट्रीय विक्रमही आहेत. मी त्याला फक्त तेच करायला सांगेन आणि ज्या खेळात तो सर्वोत्तम आहे.”
दरम्यान, वेदांत एक जलतरणपटू आहे. त्याने 48 व्या ज्युनियर नॅशनल ॲक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये चार सुवर्णपदके आणि तीन रौप्य पदके जिंकली आहेत. त्याच्या या यशाचे अनेकांकडून कौतुक केले जाते. आर माधवनच्या ‘शैतान’ चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर, यात पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली असून, तांत्रिकाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात अजय देवगण देखील मुख्य भूमिकेत आहे. R. Madhavan on Nepotism|
हेही वाचा:
मराठी इंडस्ट्री साऊथसारखी प्रगती करू शकते का? गश्मीर महाजनी म्हणाला…





