मुंबईतील आर. के. स्टुडिओच्या जागेवर गोदरेज कंपनीचे गृहसंकुल

नवी दिल्ली – मुंबईतील चेंबुरभागात प्रख्यात अभिनेते राजकपुर यांच्या मालकीच्या आर. के. स्टुडिओच्या जागी आता गोदरेज कंपनीने गृहसंकुल उभारायला घेतले आहे. हा स्टुडिओ 2.2 एकर क्षेत्राचा आहे. त्यात बांधकाम विक्री क्षेत्र 3.5 लाख चौरस फूट इतके मिळणार आहे. हा स्टुडिओ गोदरेज कंपनीने विकत घेतला असला तरी त्याची किंमत मात्र त्यांनी जाहीर केलेली नाही.

येथे गोदरेज तथर्फे भव्य गृहसंकुल उभारले जाणार आहे. मात्र त्याचा अन्य तपशीलही त्यांनी अजून जाहीर केलेला नाही. त्यात किती फ्लॅट असतील आणि त्याची किंमत काय असेल किंवा या एकूण प्रकल्पाला गोदरेजला किती खर्च येणार आहे याची माहिती कंपनीने अजून जाहीर केलेली नाही. गोदरेज आरकेएस या नावाने हा प्रकल्प उभा राहात आहे. ही जागा राजकपुर यांनी सन 1948 साली विकत घेतली होती. त्यांच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मीती येथे झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here