R Ashwin’s Retirement : सातत्य आणि कौशल्यामुळे अश्विन इतरांपेक्षा वेगळा – रवी शास्त्री

Ravi Shastri On R Ashwin’s Retirement : – भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान निवृत्तीची घोषणा करून सर्वाना आश्चर्यचकित केले. अश्विनची सातत्यपूर्ण कामगिरी आणि प्रतिस्पर्ध्यांची चिंता न करता कौशल्य सुधारण्याची स्वतः इच्छा या दोन गोष्टी अश्विनला इतरांपेक्षा वेगळ्या करतात. त्याचाकडे सातत्याने स्वतःमध्ये सुधार करण्याची भावना नेहमीच मला प्रभावित करत असल्याचे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री बोलताना म्हणाले.
आयसीसी पुनरावलोकनात बोलताना शास्त्री म्हणाले, अश्विन आहे त्या परिस्थितीमध्ये कधीच समाधानी राहिला नाही. तो सातत्याने स्वतःच्या कौशल्याना विकसित करत राहिला. त्याने गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि आपले कौशल्य दाखविले, ते निश्चित वाखाणण्याजोगे होते, असे शास्त्री बोलताना म्हणाले. डावखुऱ्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांच्या विरुद्ध त्याची कामगिरी सारखीच आहे. तो कुणासमोर गोलंदाजी करतोय, याचे त्याने कधीच दडपणे घेतले नाही. तो आव्हानानासाठी सदैव तैयार असायचा, असे शास्त्री म्हणाले.
अश्विनने २०११ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पदार्पण केले होते. त्याने ७६५ आंतरराष्ट्रीय बळी टिपले आहेत. त्यापैकी ५३७ बळी त्याने कसोटीतून मिळविले आहे. शास्त्री म्हणाले, “अश्विनला नवीन गोष्टी शिकायच्या होत्या आणि त्यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली. तो नेहमी स्वत:ला वेळेनुसार अपडेट ठेवत असे. तो एक चांगला क्रिकेटपटू आहे, त्याने घेतलेले ५३७ बळी हे त्याच्या दमदार कामगिरीची साक्ष देतात, असे शास्त्री म्हणाले.
Kapil Dev On R Ashwin’s Retirement : रविचंद्रन अश्विन योग्य सन्मानास पात्र होता – कपिल देव
अश्विन-जडेजा एकमेकांना पूरक
आपला खेळ विकसित करण्याच्या प्रक्रियेमध्ये अश्र्विनने आपल्या गोलंदाजीच्या शैलीवर देखील काम केले. यासंदर्भात बोलताना शास्त्री म्हणाले की, गेल्या चार-पाच वर्षांच्या काळात अश्विन आणि रवींद्र जडेजा ही चांगली फिरकीची जोडी जमून आली होती. जडेजाच्या बळीमध्ये अश्विनचे तर अश्विनच्या बळीमध्ये जडेजाचे योगदान होते. दोघेही एकमेकांना पूरक गोलंदाजी करून समोरच्या फलंदाजांवर दबाव ठेवत असल्याचे शास्त्री यांनी सांगितले.





