R Ashwin Clarify : अश्विनच्या एका फोन कॉलने ट्रोलर्सची तोंडं बंद! विराट कोहलीसोबतच्या नात्यावर फिरकीपटूने मांडलं स्पष्ट मत
R Ashwin clarify : आर अश्विनने या सर्व अफवांना पूर्णविराम देत खुद्द विराट कोहलीला फोन केल्याचे जाहीर केले आहे.

R Ashwin Clarify Virat Kohli phone call social media : भारतीय क्रिकेट संघातील दोन दिग्गज खेळाडू आर. अश्विन आणि विराट कोहली यांच्यात बिनसल्याच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आले होते. अश्विनने रोहित शर्माला विराटपेक्षा सरस टी-२० खेळाडू म्हटले, अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये ‘फॅन वॉर’ सुरू झाले. मात्र, अश्विनने या सर्व अफवांना पूर्णविराम देत खुद्द विराट कोहलीला फोन केल्याचे जाहीर केले आहे.
अफवेनंतर अश्विनचा विराटला ‘थेट’ फोन –
सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, अश्विनने विराटवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. हे प्रकरण वाढण्याआधीच अश्विनने विराटला फोन लावला. याबद्दल माहिती देताना अश्विनने लिहिले, “मी आत्ताच विराटशी या ‘अप्रत्यक्ष हल्ल्या’बाबत (Indirect Attack) चर्चा केली. सोशल मीडियावरील हे सनसनाटी फॅन वॉर पाहून आम्ही दोघेही खूप हसलो. आम्हा दोघांना एकमेकांशी बोलण्याची आणि आमचे नाते अधिक घट्ट करण्याची संधी दिल्याबद्दल (ट्रोलर्सचे) आभार!”
जुने मित्र आणि ‘बाँडिंग’ –
आर अश्विनने विराट कोहलीला दिले स्पष्टीकरण
विराट आणि अश्विन या दोघांनीही २०११ मध्ये कसोटी पदार्पण केले होते. विराटच्या नेतृत्वाखाली अश्विन प्रदीर्घ काळ भारताचा मुख्य फिरकीपटू राहिला आहे. चाहत्यांमध्ये रोहित, विराट आणि धोनीच्या नावावरून वाद होत असले तरी, प्रत्यक्षात हे खेळाडू एकमेकांचे उत्तम मित्र आहेत, हेच अश्विनच्या या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
हेही वाचा – Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला संघात घेऊनही का खेळवलं जात नाहीये? किशन नसूनही संधी न देण्याचं कारण आलं समोर
विराट कोहली आता थेट जुलैमध्ये मैदानात –
Just spoke to Virat about “Rajiv1841’s” concern on the indirect attack and we both had a good laugh about how social media works on such click baity fan wars.
Thanks for giving us a reason to bond and talk.☺️☺️ https://t.co/0tXfxoNM6y
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) January 29, 2026
विराट कोहलीच्या क्रिकेटमधील भविष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्याने टी-२० आणि कसोटी फॉरमॅटला यापूर्वीच अलविदा केला आहे. सध्या तो लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असून, तो आता थेट जुलै २०२६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय जर्सीमध्ये दिसेल. त्याआधी, क्रिकेट चाहते त्याला आयपीएलमध्ये आरसीबी (RCB) कडून खेळताना पाहू शकतील.





