Ravindra Chavan : पंतप्रधान मोदींच्या राजकीय निवृत्तीचा प्रश्न; भाजप प्रदेशाध्यक्ष मोजक्याच शब्दांत म्हणाले…

Ravindra Chavan : येत्या १७ सप्टेंबर या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी हे वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या निवृत्तीच्या जोरदार चर्चा सुरू होत्या.
याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील त्यांच्या वयावर विधान केलं केलं होतं. मात्र, त्यानंतर भागवत यांनी विधानाचं खंडन केलं. आता महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना याबाबत विचारण केली असताना त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही.
आध्यात्मिक गुरू तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या रुद्रपुजेचा कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला रवींद्र चव्हाण यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे त्यांनी दिली. मात्र, नरेंद्र मोदी आणि गणेश नाईक यांच्या प्रश्नावर त्यांनी बोलण्याचे टाळले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शंभर वर्ष पूर्ण केल्याचा आनंद व्यक्त केला.
तसेच नुकत्याच पार पडलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांचा विजय झाला. या निवडणुकीवर त्यांनी भाष्य केलं आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक भाजपने जिंकली. त्यांचा विजयाचा आनंद आहे. आता विजय कसा झाला आणि कोणाची मते फुटली याचा विचार करण्याची गरज नाही. आमच्या उमेदवाराचा चांगल्या मतांनी विजय झाले अधिक महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरे गटाचे मते फुटली की, आणखी कुणाची यावर चर्चा करण्याची गरज नाही, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे दोघेही वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करत आहेत. यामुळे त्यांचा वाढदिवस भाजप कसा साजरा करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा : Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी 3’चा ट्रेलर प्रदर्शित, यंदा उलगडणार शेतकऱ्यांच्या संघर्षाची कहाणी





