Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी 3’चा ट्रेलर प्रदर्शित, यंदा उलगडणार शेतकऱ्यांच्या संघर्षाची कहाणी

Jolly LLB 3: बॉलीवूडच्या लोकप्रिय कोर्टरूम ड्रामा सिरीजचा तिसरा भाग ‘जॉली एलएलबी 3’ लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी एकत्र झळकणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
3 मिनिटं 5 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी व जमिनीवरील संघर्ष दाखवण्यात आला आहे. एका श्रीमंत व्यक्तीने शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याने शेतकरी न्यायासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावतात.
इथे अर्शद वारसी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे दिसतात, तर अक्षय कुमार त्या श्रीमंत व्यक्तीचे वकील आहेत. यामध्ये गजराज राव खलनायकाच्या भूमिकेत दिसत असून त्यांचा हा अंदाज वेगळाच भासतो.
फिल्ममध्ये हुमा कुरैशी आणि अमृता राव आपल्या जुन्या भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय सीमा बिस्वास आणि संजय मिश्रा यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.
सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी 3’ ही फिल्म 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पहिल्या दोन भागांप्रमाणेच यावेळीही कॉमेडी, भावनिक क्षण आणि सामाजिक मुद्दा एकत्रित पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच दोन्ही ‘जॉली’,अर्शद वारसी आणि अक्षय कुमार एका फ्रेममध्ये दिसणार आहेत.




