महात्मा गांधींनी राणी एलिझाबेथ यांना लग्नात रुमाल दिला होता भेट, पंतप्रधान मोदींना सांगितला होता तो किस्सा

ब्रिटन आणि राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे भारताशी घनिष्ठ संबंध आहेत. त्या तीनदा भारतात आल्या होत्या. त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधी आणि तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, ग्यानी झैल सिंग आणि केआर नारायणन यांच्या भेटी घेतल्या. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची लंडनमध्ये भेट घेतली होती.
21 जानेवारी 1961 रोजी राणी एलिझाबेथने पहिल्यांदा भारताला भेट दिली होती. दिल्लीतील पालम विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या निमंत्रणावरून त्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. त्यांचे पती प्रिन्स फिलिप देखील आले होते. दिल्लीशिवाय शाही जोडप्याने मुंबई, चेन्नई आणि कोलकाता आणि आग्रा येथील प्रसिद्ध ताजमहालला भेट दिली. दिल्लीत त्यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर राणीने दिल्लीतील रामलीला मैदानावर हजारो लोकांच्या मेळाव्याला संबोधित केले.
7 नोव्हेंबर 1983 रोजी राणीने दुसऱ्यांदा भारतातला भेट दिली –

एलिझाबेथ द्वितीय ची दुसरी भारत भेट7 नोव्हेंबर 1983 रोजी होती. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी मदर तेरेसा यांना ‘ऑर्डर ऑफ द मेरिट’ हा सन्माननीय सन्मान प्रदान केला. त्यानंतर त्या कॉमनवेल्थ देशांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आल्या होत्या.
जालियनवाला बाग हत्याकांड दु:खद –

त्यानंतर राणीने 13 ऑक्टोबर 1997 रोजी तिसऱ्यांदा भारताला भेट दिली. तत्कालीन पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल आणि तत्कालीन राष्ट्रपती केआर नारायणन यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, राणीने स्वातंत्र्य चळवळीतील जालियनवाला बाग हत्याकांड दु:खदायक असल्याचे म्हंटले होते. यानंतर राणी आणि तिचे प्रिन्स फिलिप यांनी जालियनवाला बाग स्मारकाला भेट देऊन शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
गांधीजींनी रुमाल भेट दिल्याची किस्सा पंतप्रधान मोदींना सांगितला –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 आणि 2018 मध्ये यूकेच्या दौऱ्यात राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली. त्यांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांची महत्वकांक्षा आमि दयाळूपणा मी विसरणार नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणीची भेट घेतली त्यावेळी राणीने मोदींना एक रूमाल दाखवला होता, व तो महात्मा गांधींनी त्यांना त्यांच्या लग्नात भेट दिला होता.
समृद्धता आणि विविधता आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.





