…म्हणून ब्रिटनच्या महाराणी कॅमिला यांच्या मुकुटात कोहिनूर बसवणार नाही

लंडन ( Kohinoor Gem ) – ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्या समवेत महाराणी म्हणून कॅमिला यांच्या राज्यारोहणाचा सोहळा 6 मे रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी कॅमिला या जो राजमुकुट परिधान करणार आहेत, त्यामध्ये वादग्रस्त कोहिनूर हिरा जडवलेला असणार नाही. भारताने या हिऱ्यावर दावा केला आहे. तेंव्हापासून हा हिरा विशेष चर्चेत राहिला आहे.
कोहिनूर हिरा हा ब्रिटनच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या राजमुकुटात बसवलेला होता. आता वारस्याने तो महाराणी कॅमिला यांच्याकडे येईल आणि त्यांच्या राजमुकुटात जडवला जाईल, असा ंदाज व्यक्त केला जात होता. मात्र कॅमिला यांनी निवडलेल्या मुकुटामध्ये कोहिनूर बसवला जाणार नाही, असे राजघराण्याच्यावतीने स्पष्ट केले गेले आहे.
महाराणींसाठीचा मुकुट आतापर्यंत टॉवर ऑफ लंडनमध्ये प्रेक्षकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आला होता. आता या राजमुकुटामध्ये मूळच्या कोहिनूर हिऱ्याची प्रतिकृती बसवण्यात येणार आहे. मात्र राज्यारोहणाच्या सोहळ्यानंतर ही कोहिनूरची प्रतिकृती बदलली जाणार आहे का नाही, हे समजू शकलेले नाही.
105.6 कॅरेटचा कोहिनूर हा जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा हिरा असल्याचे मानले जाते आहे.
“…तर सरकार पडलेच नसते” – बाळासाहेब थोरातांचे वक्तव्य
सविस्तर वृत्त – https://t.co/M817dX75bh@bb_thorat #congress #BJP #SharadPawar #DevendraFadnavis pic.twitter.com/kyyIJzqcVa
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) February 15, 2023





