अल्लू अर्जुनसोबत पुष्पा 2 मध्ये पोलीस ऑफिसर बनून भिडणार अर्जुन कपूर ? निर्माते म्हणतात…

मुंबई – पुष्पा 2 मध्ये फहाद फासिलची जागा अर्जुन कपूर घेणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये सुरु होत्या. म्हणजेच या चित्रपटात तो पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे अशी चर्चा होती. मात्र आता या चित्रपटाचे निर्माते नवीन येरनेनी यांनी स्वतः याबाबत खुलासा केला आहे. माध्यमांशी संवाद साधत त्यांनी पुष्पाच्या दुसऱ्या पार्टचे शूटिंग देखील सुरु होणार असल्याचे स्पष्ट केले.
या चित्रपटात अर्जुन दिसणार नसल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व खोट्या बातम्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.मीडियाशी संवाद साधताना चित्रपटाचे निर्माते नवीन येरनेनी यांनी अर्जुन कपूरबाबतचे वृत्त फेटाळून लावत या चुकीच्या बातम्या असल्याचे म्हंटले आहे. अर्जुन कपूर हसीलची जागा घेणार नाही. फहाद फासिल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्जुन कपूरला घेण्याची चर्चा 100% चुकीची असल्याचे निर्मात्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आम्ही या महिन्याच्या 20 ते 30 तारखेदरम्यान पुष्पा 2 चे शूटिंग सुरू करणार आहोत. या चित्रपटाचे पहिले शूटिंग हैदराबादमध्ये होणार आहे. त्यानंतरच आम्ही जंगल आणि इतर ठिकाणी शूटिंग करू असे देखील निर्मात्यांनी यावेळी म्हंटले. पुष्पाच्या दुसऱ्या पार्टची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.





