Dharma -The AI Story Movie | आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर जोगने केले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट येत्या 18 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
बियु प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. यात पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकत्याच झळकलेल्या या पोस्टरमध्ये पुष्कर जोगच्या मागे काही कोड लँग्वेजमध्ये लिहिलेले आकडे, शब्द दिसत आहेत. एआय टेक्नॉलॉजीचा वापर या चित्रपटात कसा करण्यात आला आहे. याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. Dharma -The AI Story Movie |
View this post on Instagram
याचित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणाला क ,” ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. हा एक वेगळा विषय असून एका वडिलांची आणि मुलीची ही गोष्ट आहे. एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते. आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहाण्यासाठी धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या वडिलांची ही गोष्ट आहे. हॅालिवूडमध्ये ज्याप्रमाणे ॲक्शन सिक्वेन्स असतात, तसे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. एक नवा प्रयत्न यातून करण्यात येत आहे.’’ Dharma -The AI Story Movie |
याशिवाय ‘कोक’ या आगामी बॉलिवूड चित्रपटातही पुष्कर लीड रोलमध्ये झळकणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पुष्करने एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘टॅबू’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला.
हेही वाचा:
Kolkata: डॉक्टर तरुणीच्या हत्या प्रकरणाची CBI चौकशी होणार; उच्च न्यायालयाचे आदेश