दिग्गजांना धक्का देत बच्चू कडूंनी संग्रामपूर नगरपंचायतीत एकहाती बाजी मारली
Updated On:

मुंबई : राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने बुलढाण्यातील संग्रामपूर नगरपंचायतीत एकहाती बाजी मारली आहे. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीच्या 12 उमेदवार निवडून आले असून काँग्रेसला 4 तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर भाजपला एकही जागा मिळालेली नाही. मंत्री राजेंद्र शिंगणे आणि संजय कुटे या दोघांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी अखेर करुन दाखवले आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला.
रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावे लागले.
संग्रामपूर नगर पंचायतीचे अंतिम निकाल
प्रहार – 12
काँग्रेस – 04
शिवसेना – 01





