‘राम कृष्ण हरी’ म्हणत ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून पुरुषोत्तम पाटील पडले बाहेर

Bigg Boss Marathi 5 | बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधील पहिला आठवडा चांगलाच गाजला. यानंतर आता पहिले एलिमिनेशन देखील झाले आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून पहिले स्पर्धक कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील बाहेर पडले आहेत. रविवारी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने पहिल्या एलिमिनेट झालेल्या सदस्याचं नाव जाहिर केले.
बिग बॉस मराठीच्या पहिल्याच आठवड्यात सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, धनंजय पोवार आणि किर्तनकार पुरुषोत्तम पाटील हे एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले होते. शनिवारी रितेशने दोन सुरक्षित सदस्यांची नावं जाहिर केली होती. त्यावेळी सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे दोघे सुरक्षित झाले होते. त्यानंतर तिघांपैकी कोण घराच्या बाहेर जाणार ? हा प्रश्न होता. त्यात पुरुषोत्तम यांना घराच्या बाहेर जावे लागले.
‘राम कृष्ण हरी’ म्हणत त्यांनी बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. यावेळी घरातील इतर सदस्य भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरोडे याला यावेळी अश्रू अनावर झाले. पुरुषोत्तम दादा घराबाहेर पडताना घनश्यामनं त्यांना घट्ट मिठीही मारली. पुरुषोत्तम बाहेर पडल्याने घरात आता 15 सदस्य उरले आहेत. यांच्यात आता तगडी लढत होणार असल्याचे दिसत आहे. Bigg Boss Marathi 5 |
दरम्यान, पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. वर्षा उसगांवकर यांच्यावर तिने हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. यावरून चुकीच्या गोष्टींबाबत कुणीही भूमिका न घेतल्याने रितेशने इतर सदस्यांना झापलं. यानंतर आता या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या नवीन घरातील पहिला कॅप्टन होण्यासाठी जंगी सामना पाहायला मिळणार आहे. Bigg Boss Marathi 5 |
हेही वाचा:
अमित शाहांनी पंतप्रधानांबद्दल केली मोठी भविष्यवाणी ; म्हणाले,”जे करायचे ते करा…”





