पंजाब नॅशनल बॅंकेकडून गृहकर्जावरील व्याजदरात सवलत
Updated On:

नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बॅंकेने 50 लाख रुपयांवरील गृहकर्जावरील व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात करून हा व्याजदर 6.60 टक्के इतका केला आहे.
कर्ज घेणाऱ्याचे पूर्वीचे कर्जफेडीचे रेकॉर्ड पाहून या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
उत्सवाच्या काळामध्ये ही बॅंक प्रक्रिया शुल्क माफ करणार आहे. ज्या कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले जाणार आहेत त्यामध्ये घर, वाहन, वैयक्तिक कर्जाचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बॅंकेने रेपो लिंक्ड लेंडिंग रेटमध्येही कपात करून तो 6.55 टक्के इतका केला आहे.





