पंजाबमध्ये 1 जुलैपासून प्रत्येक घरात 300 युनिट मोफत वीज

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारने प्रत्येक घरात 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. 1 जुलैपासून दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळण्यास सुरुवात होणार आहे. पंजाब सरकारने ही मोठी घोषण केली आहे. पंजाब सरकारच्या या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत केले जात आहे.
पंजाबमध्ये भगवंत मान यांचे सरकार स्थापन होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. अशातच पंजाब सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत मोठी घोषणा केली आहे. आता 1 जुलैपासून राज्यातील प्रत्येक घराला 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे.
पंजाबमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून 300 युनिट वीज मोफत देण्याची तयारी सुरू होती. यापूर्वी मान यांनी पंजाबच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. दिल्लीच्या धर्तीवर, पंजाब विधानसभा निवडणुकीच्या 2022 दरम्यान, AAP ने सत्तेत आल्यास राज्यातील जनतेला दरमहा 300 मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन आपने आज पुर्ण केले आहे.
दरम्यान, अलीकडेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पंजाबमधील 300 युनिट मोफत वीज योजनेबाबत चर्चा केली. तेव्हापासून या घोषणेबाबत अटकळ बांधली जात होती.





