#Punjab Election 2022: ‘आप’ही सोनिया गांधींची बी टीम – मीनाक्षी लेखी

नवी दिल्ली – आम आदमी पार्टी म्हणजे कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची “बी टीम’ आहे आणि हा पक्ष कॉंग्रेसशी संगनमत करून काम करत असल्याची टीका केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केली आहे.
“आप’चे दिल्ली मॉडेल पंजाबमधील जनतेचा विश्वासघात करत आहे. “आप’चे पंजाबसाठीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान हे सर्वात मोठे खोटारडे आहेत. “आप’ला तयार करण्यासाठी कॉंग्रेसने किती पैसा खर्च केला आहे, हे त्यांना माहिती आहे का? “आप’ ही सोनिया गांधींची “बी टीम’ आहे.
दिल्लीमध्ये 524 कोटींच्या जाहिराती करण्याव्यतिरिक्त या पक्षाने काय काम केले आहे? “आप’ दिल्लीचा विश्वासघात करत आहे. त्या मॉडेलच्या माध्यमातून ते आता पंजाबचा विश्वासघात करू पाहात आहेत, अशी टीका लेखी यांनी केली.
“आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्यावर कुमार विश्वास यांनी केलेल्या आरोपांमुळे चहुबाजूंनी टीका होत आहे. त्याही संदर्भाने लेखी यांनी जोरदार टीका केली आहे.





