Punjab Blast । पंजाबमधील मुक्तसर साहिब भागातील लांबी येथील पिड सिंग वाला येथील फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे २५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी भटिंडा येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील एका गावाजवळ घडली. एका फटाके उत्पादन आणि पॅकेजिंग युनिटमध्ये स्फोट झाला. पोलिसांनी काय म्हटले? Punjab Blast । एजन्सीनुसार, लांबीचे पोलिस उपअधीक्षक जसपाल सिंह यांनी फोनवरून सांगितले की, ही घटना श्री मुक्तसर साहिबमधील सिंघावली-कोटली रोडवरील एका दुमजली फॅक्टरी युनिटमध्ये घडली. डीएसपी म्हणाले की, स्फोटामागील कारणांचा तपास केला जात आहे. हेही वाचा डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफबाबत दिलासा ; फेडरल कोर्टाने तात्पुरती बंदी पुन्हा लागू केली