पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी ‘जिवलगा’

अभिनेता स्वप्निल जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. निमित्त होतं ते स्टार प्रवाहवर २२ तारखेपासून सुरु होणाऱ्या ‘जिवलगा’ मालिकेचं. या नव्या प्रोजेक्टसाठी सिद्धार्थ आणि स्वप्निलने बाप्पाचा आशीर्वाद घेतला.
बऱ्याच वर्षांनंतर स्वप्निल आणि सिद्धार्थ टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. त्यामुळे ‘जिवलगा’ ही मालिका दोघांसाठीही खुपच स्पेशल आहे. ‘जिवलगा’ ही एक खिळवून ठेवणारी प्रेमकथा आहे आणि प्रेक्षकांच्याही ती दीर्घकाळ लक्षात राहील. परस्परसंबंधांची ही कथा असून शेवटी जे योग्य त्याच्या बाजूने ती प्रवास करते. भाषिक दूरचित्रवाहिनीवर अशा प्रकारचे भव्यदिव्य पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहे. ‘स्टार प्रवाह’ या माध्यमातून सुपरस्टार कलाकार आणि उत्तम कथा असे एक महत्वपूर्ण पाऊल उचलत आहे. ‘जिवलगा’ ही एक उत्तम अशी कथा असून त्यात व्यक्तिरेखांची मानवी कड अनुभवायला मिळेल.





