पुण्याच्या आर्यन महाजन, ऋषभ कोटेचे जेईई ऍडव्हान्स्डमध्ये यश

पिंपरी – आईआईटी गुवाहाटीने देशातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई-एडवांस्डचा निकाल जाहीर केला. यामध्ये एलन करिअर इन्स्टिटयूट पुणे या निकालात उत्कृष्ट ठरले आहे. आर्यन महाजनने 289 गुणांसह ऑल इंडिया रॅंक 79 तर ऋषभ कोटेचा याने 287 गुणांसह 89 वा क्रमांक पटकावला आहे. एलन पुण्याचे ऑल इंडिया रैंक टॉप 500 मध्ये 6 विद्यार्थी आणि टॉप 1000 मध्ये 10 विद्यार्थी आहेत, अशी माहिती एलन पुण्याचे केंद्र प्रमुख अरुण जैन यांनी दिली.
एलनचे 4 विद्यार्थी राष्ट्रीय निकालात पहिल्या 10 मध्ये आहेत. टॉप-50 मध्ये 19 विद्यार्थी एलनचे आहेत. यासह, एलनच्या टॉप-100 मध्ये 37 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 31 विद्यार्थी वर्गातील अभ्यासक्रमातील आहेत आणि 6 विद्यार्थी दूरस्थ शिक्षणाद्वारे एलनसोबत जोडलेले असल्याचे जैन यांनी सांगितले. यावर्षी जेईई एडवांस्ड ची आयआयटी गुवाहाटी द्वारे 4 जून रोजी देशातील 221 परीक्षा शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. निकालासोबतच अंतिम उत्तरपत्रिकाही जाहीर करण्यात आली आहे. गेल्या 11 वर्षांच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक 1 लाख 90 हजार विद्यार्थ्यांनी जेईई-ऍडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
जेईई ऍडवांस्ड मध्ये यश मिळवण्यासाठी मी एलन मधील शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार तयारी केली होती. फिजिक्स आणि मॅथ्समध्ये थ्योरी क्लिअर करण्याबरोबरच सरावावर अधिक भर देण्यात आला. तर केमिस्ट्रीमध्ये एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमावर पूर्ण भर देऊन तयारी करण्यात आली. प्रश्नांचा पुन्हा पुन्हा सराव मी करत होतो. त्यामुळे आत्मविश्वास वाढला, असे आर्यन महाजन म्हणाला.
जेईई ऍडवांस्ड मध्ये यश मिळवण्यासाठी मी एलनच्या धोरणात्मक नियोजनानुसार तयारी केली होती. एलनच्या प्रश्नपत्रिकेच्या सरावावर भर दिला. तर रसायनशास्त्रात एनसीईआरटी अभ्यासक्रमावर पूर्ण लक्ष केंद्रित करून तयारी करण्यात आली. माझ्या यशात माझ्या आई-वडिलांचा मोठा वाटा होता, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी ही रॅंक मिळवली आहे, असे ऋषभ कोटे म्हणाला





