e-KYC Mandatory: ई-केवायसी करा, नाहीतर वेतन विसरा
e-KYC Mandatory: शालार्थधारक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० सप्टेंबरपर्यंत मुदत

पिंपरी – शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी आता अत्यावश्यक झाले आहे. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास ऑक्टोबरचे वेतन रोखण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील शिक्षकांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
राज्यातील अनुदानित, खासगी अनुदानित आणि जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही प्रक्रिया लागू आहे. वेतन प्रणालीतील नोंदी अचूक ठेवणे आणि दुबार वेतनाला आळा घालणे हा यामागचा उद्देश आहे. यापूर्वी ई-केवायसीसाठी कमी कालावधी देण्यात आला होता. त्यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना अडचणी आल्या.
तांत्रिक अडथळे आणि प्रणालीवरील वाढता ताण यामुळे ही प्रक्रिया रखडली. त्यानंतर मुदतवाढ देण्यात आली आहे. ई-केवायसीसाठी स्वतंत्र प्रक्रिया करण्याऐवजी शालार्थ प्रणालीतच सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी होईल. कागदपत्रांची पडताळणीही वेगाने करता येईल.
शिक्षकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता ई-केवायसी पूर्ण करावी. आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. प्रक्रिया पूर्ण झाल्याची खात्री करावी. वेतन थांबण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनानेही तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी दिपकेंचा फोटो कार्यालयात लावावा : संजय राऊत





