‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चे महाविजेते ठरले पुण्याचे आकाश आणि सुरज मोरे

‘Mi Honar Superstar Jodi No1’winners| स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ या शोचा महाअंतिम सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यात पुण्याची जिगरबाज जोडी आकाश आणि सुरज मोरे यांनी विजेतेपदाचा मान मिळवला आहे. तर उपविजेते पद हे दोन जोड्यांना विभागून देण्यात आले आहे.
यंदा महाअंतिम फेरीत पलख-पूर्वा, आकाश-सुरज, सिद्धेश-रुचिता आणि अपेक्षा-प्रतिक्षा यांच्यामध्ये तगडी लढत झाल्याचे पाहायला मिळाले. यातआकाश आणि सुरज मोरे या जिगरबाज जोडीने बाजी मारली. तर उपविजेते पदाचा मान सिद्धेश थोरात-रुचिता जामदार आणि अपेक्षा-प्रतिक्षा लोंढे या दोन जोड्यांना विभागून देण्यात आला. ‘Mi Honar Superstar Jodi No1’winners|
View this post on Instagram
बक्षीस स्वरूपात काय मिळाले ?
तर तृतीय क्रमांक पूर्वा साळेकर आणि पलक मोरे या जोडीने पटकावला. महाअंतिम सोहळ्यातील विजेती जोडी आकाश आणि सुरज मोरे यांना पाच लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. तर उपविजेता जोडीला दोन लाख आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या जोडीला 1 लाख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. ‘Mi Honar Superstar Jodi No1’winners|
दरम्यान, आकाश आणि सुरज दोघेही सख्खे भाऊ असून लहानपणापासूनच त्यांना नृत्याची आवड होती. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असतानाही आईने त्यांना नृत्याचं प्रशिक्षणासाठी पाठवले. त्यानंतर दोघेही अनेक छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतं. त्यानंतर ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’मध्ये आकाश आणि सुरजने मोठे यश मिळवले.
हेही वाचा:
पावसाने उत्तराखंड, महाराष्ट्रातच नाही तर यूपी-बिहारमध्येही हाहाकार सुरू ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा





