आंतरराष्ट्रीय सायकलपटू बिलाल अहमद दारच्या ऑलिम्पिक स्वप्नाला पुनीत बालन ग्रुप देणार बळ

पुणे : काश्मीर व्हॅलीचा एकमेव आंतरराष्ट्रीय सायकलपटू बिलाल अहमद दारच्या ऑलम्पिक स्वप्नाला पुनीत बालन ग्रुपकडून बळ मिळणार आहे. दार यांच्या ऑलम्पिक मिशनसाठी पुनीत बालन ग्रुप मदत करणार असून यासंबंधीचा सहकार्य करार नुकताच झाला. या कररामुळे ऑलम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत मिळणार आहे.
पुण्यातील पुनित बालन ग्रुप 2018 पासून जम्मू आणि काश्मीर खोर्यात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. याशिवाय येथील विविध क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणार्या तरुणांना पुनीत बालन ग्रूपकडून सर्वोतपरी मदत केली जात आहे. त्यामुळे येथील तरुणांना आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणे शक्य होऊ लागले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने या गटाने आफरीन हैदर (तायक्वांदो), मुहम्मद सलीम (सायकलिंग) उमर शाह (क्रिकेट) आणि उमीर सय्यद (खो खो) या खेळाडूंसह आतापर्यंत जवळपास पाच हजारांहून तरुणांना पाठिंबा दिला आहे.
आता या ग्रुपने काश्मीर व्हॅलीचा एकमेव आंतरराष्ट्रीय सायकलपटू बिलाल अहमद दार यांच्याशी नुकताच करार केला आहे. या करारातंर्गत दार याला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत बालन ग्रुपच्या माध्यमातून केली जाणार आहे.
दरम्यान पुनीत बालन इंद्राणी बालन फाऊंडेशनाच्या माध्यमातून काश्मीर खोर्यात अनेक सामाजिक उपक्रमही सुरू आहेत. दहशतवाद ग्रस्त मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी उचलली असून लष्क़राच्या सहकार्याने अति संवदनशील भागातील शाळा चालवित आहेत.
जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रचंड क्षमता आणि प्रतिभा आहे. येथील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि व्यावसायिक स्पर्धा करण्याची तसेच देशासाठी पदके जिंकण्याची स्वप्ने पूर्ण करू शकतील. त्यामुळे या खेळांडुना सर्वोतोपरी मदत पुनित बालन ग्रुप आणि इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत.




