Satara: पुनित बालन ग्रुपतर्फे सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या टी शर्ट, पदक व थीम साँगचे अनावरण
Satara कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची वैशिष्ट्ये आणि नियोजनाची माहिती दिली.

Satara: सातारा रनर्स फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या यंदाच्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या अधिकृत टी शर्ट, पदक आणि थीम साँगचे अनावरण पुनित बालन ग्रुपतर्फे सातारा क्लबमध्ये रविवारी दिमाखात करण्यात आले. संडे लाँग रनच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमात 500 हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची वैशिष्ट्ये आणि नियोजनाची माहिती दिली. मॅरेथॉनमधील प्रत्येक स्पर्धकाला दरवर्षी उत्कृष्ट दर्जाचे, आकर्षक रंगसंगतीचे टी शर्ट दिले जातात. हे टी-शर्ट परिधान करून धावणे धावपटूंसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा रनर्स फाउंडेशन आणि इंडिया केअर फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सांबरवाडी, यवतेश्वर, गोळीबारनगर, कृष्णानगर, विक्रांतनगर, कण्हेर (जांभळेवाडी), सदरबझार येथील तक्षशीला आणि बापूसाहेब चिपळूणकर या शाळांना क्रीडा साहित्य देण्यात आले. तीन शाळांमध्ये लहान मुलांसाठी मंकी बार्स (व्यायामशाळा) उभारण्यात आल्याचे उपाध्यक्ष विशाल ढाणे यांनी सांगितले.
मॅरेथॉनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. संदीप काटे यांनी यंदाच्या थीम साँगची संकल्पना स्पष्ट केली. रवींद्र नलवडे यांनी पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनसाठी रचलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या थीम साँगचे अनावरण करण्यात आले. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, या वर्षीच्या मॅरेथॉनचे मुख्य प्रायोजक पुनित बालन ग्रुपचे स्पोर्टस् मॅनेजर आनंद ओझा, टेक्नोस्पोर्टचे संचालक संदीप झुनझुनवाला, पुष्पेन मेथी, एयू स्मॉल फायनान्स बँकेचे शैलेश नांद्रे, सातारा शाखाधिकारी प्रदीप गुरव, ‘झंडू’चे गणेश भागवत, पोकारी स्वेट ग्रुपच्या संचालिका श्रीया शेट्टी, पल्स हॉस्पिटलचे संस्थापक डॉ ओंकार पाटील, सहसंस्थापक डॉ. कौशिक पाटील, रेस डायरेक्टर डॉ. अविनाश शिंदे, जॉइंट रेस डायरेक्टर डॉ. दीपक बनकर, खजिनदार राहुल घायताडे, संस्थापक-सदस्य डॉ. प्रतापराव गोळे, अॅड. कमलेश पिसाळ, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, डॉ. सुचित्रा काटे, डॉ. देवदत्त देव, अभिषेक भंडारी, डॉ. पल्लवी पिसाळ, भाग्यश्री ढाणे, डॉ. दीपक थोरात, डॉ. अदिती घोरपडे, डॉ. रंजिता गोळे, डॉ. अश्विनी देव, केतकी पंडित, डॉ. कविता बनकर, श्रुती भंडारी, भाविका मुथा, डॉ. विकास पाटील, दिनेश उधाणी, डॉ. कैलास खडतरे, आर्किटेक्ट नितीन किरवे, पंकज नागोरी, प्रफुल्ल पंडित, सारंग गुजर, निशाद पंडित, निरंजन पिसे, जयंत शिवदे, सागर निंबाळकर, माधुरी शिवदे, प्रायोजक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सीएस नेहा दोशी यांनी सूत्रसंचालन केले. संयोजन समितीचे सचिव शैलेश ढवळीकर यांनी आभार मानले.





