#PuneCrime | मोक्यातील फरारीसह शिकलकरी टोळीला अटक
Updated On:

पुणे (प्रतिनिधी) – मोक्यातील शिकलकरी टोळी प्रमुखाच्या मुस्क्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. त्याच्या इतर साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांना त्यांना अटक केली.
त्यांच्याकडून मोटार,पिस्तूल, कोयता, कटावणी, मिरची पूड असा मिळून ३ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ७ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
टोळीप्रमुख तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय २८, रा. रामटेकड) निशांत उर्पâ ब्लॅक अनिल ननावरे (वय २३, रा. महंमदवाडी), सुनील प्रकाश गायकवाड (वय २३ रा. रामटेकडी) गणेश राजेंद्र शिवाडकर (वय २१ रा. रामटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार किशोर प्रशांत गायकवाड आणि आकाश गणपत माने पळून गेले आहेत.





