#PuneCrime | वाघाटे खुन प्रकरणातील मुख्य सूत्रधारास पोलीस कोठडी
Updated On:

पुणे(प्रतिनिधी) – सहकारनगर भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार माधव हनुमंत वाघाटे (वय 28) याच्या खुन प्रकरणातील मुख्य सूत्रधारास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. आऩंद निवृत्ती कामठे (वय 27, रा. बिबवेवाडी) असे त्याचे नाव आहे.
न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अद्यापपर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून, सर्वांना २१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत २२ वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे.
ही घटना १५ मे रोजी रात्री दिडच्या सुमारास बिबवेवाडी ओटा परिसरात घडली. यावेळी, आरोपी व त्याच्या साथीदारांनी वाघाटे यास लाकडी बांबू, दगड, लोखंडी रॉडसाऱखे हत्यार तसेच ट्युबलाईटने मारहाण करत त्याचा खून केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.





