#PuneByElection : चिंचवड पोटनिवडणुकीत 50.47 टक्के मतदान

पिंपरी (प्रतिनिधी) – गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अटी-तटीच्या लढतीचा रविवारी शेवट झाला. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या 28 उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी आज इव्हीएममध्ये बंद केले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या तिरंगी लढतीत सकाळी काहीसा निरुत्साह दिसून येत होता. परंतु दुपारनंतर मतदानाला वेग आला. त्यामुळे एकुण 50.47 टक्के इतके मतदान झाले.
#चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५०.४७ टक्के मतदान pic.twitter.com/SsPWzKunZS
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) February 26, 2023
या पोटनिवडणुकीत एकूण 28 उमेदवार मैदानात असले तरी भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल ऊर्फ नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे या तिघांमध्येच खरी लढत झाली. रविवार (दि. 26) सकाळी सात वाजल्यापासून 87 मतदान केंद्रांवरील 510 बुथवर मतदान प्रक्रिया पार पडली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण पाच लाख 68 हजार 964 मतदार आहेत. त्यात तीन लाख दोन हजार 946 पुरुष तर दोन लाख 65 हजार 974 महिला आणि तृतीयपंथी 34 मतदार आहेत. दिवसभरात एकुण एकूण 2 लाख 87 हजार 145 इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/opposition-should-unite-for-lokayukta-bill-deputy-cm-devendra-fadnavis/
मतदानाचा हक्क बजाविणाऱ्यांमध्ये 1 लाख 57 हजार पुरुष, 1 लाख 29 हजार महिला व इतर चारजणांचा समावेश आहे. गुरुवार (दि. 2) रोजी मतमोजणी होणार असल्याने आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

